लातूर येथे धर्मांध भाजी विक्रेत्याने हिंदु तरुणीची छेड काढल्याने हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक !

‘जशास तसे’ उत्तर देणार !

असे प्रकार केवळ महात्मा फुले भाजी मंडईतच होतात असे नाही, तर इतर भाजी बाजार, गंजगोलाई आणि अन्य ठिकाणीही महिला, तरुणी यांना छेडण्याचे प्रकार होत आहेत. भाजी, फळ विक्रेते यांच्याकडून दुहेरी अर्थाचे बोलून महिलांना त्रास देण्याचा जिहादी प्रकार लातूर येथे होत आहेत. यापुढे ही गोष्ट निदर्शनास आल्यास त्याला त्याच ठिकाणी ‘जशास तसे उत्तर देऊ’, अशी चेतावणी श्रीकांत रांजनकर यांनी दिली.

लातूर – शहरातील प्रमुख महात्मा फुले भाजी मंडईमध्ये भाजी खरेदीसाठी गेलेल्या एका तरुणीचा येथील भाजी विक्रेता आझम काझी याने विनयभंग केला, यावर तरुणीनेही आरोपीच्या कानशिलात लगावली. (प्रत्येक तरुणीने अशी कृती केली तरच हे धर्मांध वठणीवर येतील ! यासाठी प्रत्येक तरुणीने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक ! – संपादक) यानंतर तरुणीचे नातेवाईक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे पदाधिकारी यांनी जाब विचारत पोलिसात तक्रार दिली. गुन्हेगारास कठोर शिक्षा करावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनाच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. या संतापजन्य घटनेमुळे बाजारात तणावपूर्ण शांतता होती. परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

या वेळी भाजपचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष, माजी नगरसेवक, ‘विर योद्धा संघटने’चे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत रांजनकर, मनोज डोंगरे, मनोज सूर्यवंशी यांनी सदर प्रकाराविषयी माहिती देत असे प्रकार होत असतील, तर आमच्या भगिनींनी शांत राहू नये, असे आवाहन करत या तरुणीने केलेल्या धाडसाचे कौतुक केले.

संपादकीय भुमिका

  • हिंदूंनो, धर्मांधांकडून भाजी घ्यायची का ? ते ठरवा !
  • धर्मांधांचा वाढता उद्दामपणा थांबवण्यासाठी त्यांना अती कठोर शिक्षा होणे आवश्यक !