Karnataka Hindu Symbols Removal Order : गंगावती (कर्नाटक) येथील विद्युत् खांबांवरील हिंदूंची धार्मिक चिन्हे काढण्याचा जिल्हाधिकार्यांचा आदेश
|
गंगावती (कर्नाटक) – येथील रस्त्यांवर सुशोभिकरणासाठी लावण्यात आलेल्या विद्युत् दिव्यांच्या खाबांवरील धार्मिक चिन्हे काढण्याचा आदेश जिल्हाधिकार्यांनी दिला आहे. तसेच कर्नाटक ग्रामीण मूलभूत सुविधा विकास संस्थेविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचाही आदेश दिला.
गंगावती तालुका श्री हनुमंताचे जन्मस्थान मानले जाते. यामुळे या दिव्यांच्या खांबांना भगवान श्रीराम आणि भगवान हनुमान यांच्या शस्त्रास्त्रांचे प्रतीक म्हणून गदा आणि धनुष्य हे सुशोभिकरण म्हणून लावण्यात आले होते. याला बंदी घालण्यात आलेली जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा राजकीय पक्ष ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ने आक्षेप घेत खांबांवरील चिन्हे काढण्याची मागणी केली होती. तसेच संबंधितांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचीही मागणी करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकार्यांनी शहरातील धार्मिक सलोखा बिघडू नये, यासाठी खांबांवरील चिन्हे काढण्याचा आदेश दिला. (अशा प्रकारचे खांब लावल्याने जर धार्मिक सलोखा बिघडणार असेल, तर तेे काढल्यामुळे धार्मिक सलोखा बिघडला, तर त्याला कोण उत्तरदायी रहाणार ? याचे उत्तर जिल्हाधिकारी देतील का ? – संपादक)
हे विद्युत् खांब गंगावती भागातील राणा सर्कल आणि ज्युलियानगर येथे सुशोभिकरणासाठी बसवण्यात आले होते. याविषयी हिंदु संघटनांनी ‘हा मार्ग १२ कि.मी.चा असून भाविकांना प्रेरणा मिळावी, यासाठी या चिन्हांचा वापर करण्यात आला होता. यामध्ये कोणता धार्मिक विसंवाद दिसून येतो ?’, असा प्रश्न जिल्हाधिकार्यांना विचारला आहे.
संपादकीय भूमिका
|