Prayagraj Madrasa Fake Currency : प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील एका मदरशामध्‍ये छापल्‍या जात होत्‍या १०० रुपयांच्‍या नकली नोटा !

महाकुंभमेळ्‍यात या नोटा चलनात आणण्‍याचा होता प्रयत्न !

(डावीकडे) नकली नोटा व त्या छापण्याचा कारखाना असलेला मदरसा (उजवीकडे) अटक करण्यात आलेले आरोपी

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथे एका मदरशामध्‍ये नकली नोटा छापण्‍याचा  कारखाना सापडला आहे. मदरशात शिकणारे विद्यार्थी घरी गेल्‍यानंतर यातील एका खोलीत असणार्‍या कारखान्‍यात १०० रुपयांच्‍या नोटांची छपाई केली जात होती. रात्रभर या ठिकाणी छपाईचे काम केला जात होते. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाल्‍यावर धाड टाकून ४ जणांना अटक केली. त्‍यात मदरशाचा मुख्‍याध्‍यापक मौलवी (इस्‍लामचा धार्मिक नेता) महंमद तफसीरुल, आरीफीनसह महंमद अफजल, तसेच महंमद साहिद आणि जाहीर खान उपाख्‍य अब्‍दुल जाहीर यांचा समावेश आहे. घटनास्‍थळावरून मोठ्या प्रमाणावर नकली नोटा आणि नोटा छापण्‍याचे साहित्‍य जप्‍त करण्‍यात आले आहे. ३ महिन्‍यांपासून हा कारखाना चालू होता.

पुढील वर्षांत येथे होणार्‍या महाकुंभात या नकली नोटा मोठ्या प्रमाणावर चलनात आणण्‍याची सिद्धता आरोपींनी केली होती.

संपादकीय भूमिका

मदरसे हे जिहादी आतंकवाद्यांचे अड्डे आहेत. तेथे शस्‍त्रसाठा सापडतो, तसेच बलात्‍कार केले जातात. आता नकली नोटाही छापल्‍या जात आहेत. हे पहाता देशातील सर्व मदरसे बंद करणेच योग्‍य ठरणार आहे !