Ghaziabad Hindu Girl Rape : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानाकडून अल्पवयीन हिंदु मुलीवर घरात घुसून बलात्कार
जमावाने आरोपीचे भंगाराचे दुकाने पेटवले !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथे २९ ऑगस्टच्या सायंकाळी एका अल्पवयीन मुलीवर फैजान याने घरात घुसून बलात्कार केल्यानंतर येथे जमावाकडून हिंसाचार करण्यात आला. जमावाने फैजान याच्या भंगाराच्या दुकानाला आग लावली. तसेच येथील वाहनांची जाळपोळ केली. या वेळी पोलिसांनी जमावाला लाठीमार करून पांगवले. पोलिसांनी फैजान याला अटक केली असून हिंसाचार करणार्यांवरही कारवाई केली जात आहे. बलात्काराच्या वेळी फैजान याचे मित्रही तेथे उपस्थित होते. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
A minor Hindu girl was raped by a Mu$l!m man who broke into her house – Angry mob set fire to the accused’s scrap shop
📍Ghaziabad (Uttar Pradesh)
It is shameful for the rulers of all political parties that the public is taking the law into their own hands because criminals are… pic.twitter.com/E8S7h53fMi
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 30, 2024
हिंदु संघटनांचे म्हणणे आहे की, ब्रिज विहार भागामध्ये मुसलमानांची भंगाराची अनेक दुकाने आहेत. जेव्हा जमावाने फैजानच्या दुकानाची तोडफोड केली, तेव्हा तेथून बंदुकीच्या गोळ्या असलेला एक पट्टा (मॅगझीन) सापडला.
संपादकीय भूमिकाकायद्याद्वारे गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळत नसल्याने जनता कायदा हातात घेत आहे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! |