महापालिकेकडे श्री गणेशमूर्तींचे दान करून सेंद्रिय खत मिळवा !
पुणे महापालिकेचे भाविकांना धर्मद्रोही आवाहन !
नागरिकांना मूर्तीविसर्जन नदीत न करता हौदांमध्ये करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन !
पुणे – जे भाविक श्री गणेशमूर्ती महापालिकेकडे दान करतील, अशा १५ सहस्र नागरिकांना सेंद्रिय खताची पिशवी भेट दिली जाणार आहे. पुणे महापालिकेने हा उपक्रम आखला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी., उपायुक्त संदीप कदम यांनी १५ क्षेत्रीय कार्यालयांचे अधिकारी, स्वच्छता कर्मचारी, आरोग्य निरीक्षक यांची बैठक घेतली. मूर्तींचे विसर्जन नदीत न करता हौदांमध्ये करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन द्यावे. त्यासाठी हौदांमधील गाळ बाहेर काढून रंग देऊन त्यात स्वच्छ पाणी भरावे, असे आदेश बैठकीत देण्यात आले.
गणेशोत्सवात गर्दीमुळे कचरा निर्माण होतो. तो उचलला न गेल्याने शहर अस्वच्छ होते. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने ३ सत्रांमध्ये कर्मचारी नियुक्त करावेत. नागरिकांकडून उघड्यावर कचरा फेकला जातो, अशा ठिकाणी लक्ष ठेवून कचरा फेकण्यावर प्रतिबंध करावा, अशी सूचनाही देण्यात आली.
संपादकीय भूमिका :धर्मशास्त्रानुसार मूर्तीदान अयोग्य आणि अशास्त्रीय आहे. केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळीच भाविकांच्या धर्मभावनांचा विचार न करता अशा प्रकारे आवाहने केली जातात. गणेशभक्तांनीच आता दान घेतलेल्या श्री गणेशमूर्तींचे तसेच हौदांमध्ये विसर्जन केलेल्या मूर्तींचे काय होते, याचे वास्तव जाणून धर्मभावना दुखावणार्या पुणे महापालिकेला जाब विचारला पाहिजे ! |