चला रामनाथीला जाऊ !

श्री. रमाकांत दाभाडकर

चला रामनाथीला जाऊ ।
गुरुचरणी माथा ठेवू ।। धृ. ।।

सर्व साधक झाले गोळा ।
संगती संतांचा मेळा ।।
भाव असे आमुचा भोळा ।
गुरुचरणी ठेवू डोळा ।। १ ।।

गुरुभक्तीची वारी ।
निघाली आपुल्या पंढरपुरी ।।
ही वारी कल्याणकारी ।
जीवनातील दुःखे हारी ।। २ ।।

आम्हावरी गुरूंची छाया ।
घडविला साधना पाया ।।
सोडविली आमुची माया ।
पावन केली आमुची काया ।। ३ ।।

भेटी लागी जिवा ।
लागलीसे आस ।।
गुरुचरण दर्शनाची ।
वाट बघती दास ।। ४ ।।

दाविला मार्ग मुक्तीचा ।
लाविला ध्यास भक्तीचा ।।
भाव असो तव चरणा ठायी ।
तुम्हाविना आम्हा थारा नाही ।। ५ ।।

।। श्री गुरुदेव । श्री गुरुदेव ।।
।। जय गुरुदेव । जय गुरुदेव ।।
।। जय जय जयंत । जय जय जयंत ।।

टीप : जयंत : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळजी आठवले

– श्री. रमाकांत दाभाडकर (वय ८२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), यवतमाळ

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक