विरार येथे अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणार्या शिक्षकाला नागरिकांकडून चोप !
रस्त्यावरून धिंड काढत दिले पोलिसांच्या कह्यात
ठाणे, २९ ऑगस्ट (वार्ता.) – खासगी शिकवणीमध्ये शिकणार्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणार्या शिक्षकाला चोप देऊन नागरिकांनी त्यांची धिंड काढली. विरार पोलिसांनी आरोपी शिक्षकाला कह्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. शिक्षकाने ७ वीत शिकणार्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याने ती घाबरून २ दिवस शिकवणीला गेली नाही. घरच्यांनी कारण विचारल्यावर तिने हा प्रकार सांगितला. यानंतर मुलीचे पालक आणि संतप्त नागरिक शिकवणीवर्गात गेले. त्यानंतर वरील प्रकार झाला. या मारहाणीत आरोपी शिक्षक रक्तबंबाळ झाला होता.
संपादकीय भूमिकाअशा वासनांधांना चोप देण्यासह त्यांच्यावर कठोर कारवाईही व्हायला हवी ! |