अहंपणा नष्ट करण्यासाठी श्रीरामाला शरण जाऊन प्रार्थना करा !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने होत आहे, हे समजून समाधानात रहा. वाईटाविषयी कंटाळा किंवा सुखाविषयी आसक्ती नको. असे वागल्याने हवे-नकोपण नाहीसे होते आणि अहंपणाला जागाच उरत नाही. रामाला अनन्यभावे शरण जा. ‘रामा, तू ठेवशील त्यात आनंद मानीन’, अशी त्याच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना करा. तो तुम्हाला साहाय्य करायला सदैव सज्ज आहे. आपण अभिमानामुळे साहाय्याकरता हातच पुढे करत नाही, त्याला तो काय करणार ? भगवंताचे प्रेम एक त्याच्या नामानेच साधेल. नेहमी भगवंताच्या नामात राहून आनंदात आयुष्य घालवा. भगवंत कृपा करील हाच माझा आशीर्वाद !

– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

(‘पू. प्रा. के.वि. बेलसरे – आध्यात्मिक साहित्य’ या फेसबुकवरून साभार)