फरीदाबाद (हरियाणा) येथील श्री. विवेक कुमार यांना ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्यानंतर स्वतःत जाणवलेले पालट अन् आलेल्या अनुभूती

१. जाणवलेले पालट

श्री. विवेक कुमार

१ अ. काही वर्षांपासून असलेला खोकला नामजप केल्यामुळे नाहीसा होणे आणि अन्य शारीरिक त्रासही दूर होणे : ‘वर्ष २०१८ पासून मला खोकल्याचा त्रास होत होता. सर्व प्रकारचे औषधोपचार करूनही मला झालेला खोकला बरा होत नव्हता. ४.१२.२०२२ या दिवसापासून मी ‘श्री कुलदेवतायै नमः।’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप करण्यास प्रारंभ केल्यानंतर ३ – ४ दिवसांमध्ये माझा खोकला काही प्रमाणात न्यून होऊ लागला. ‘१२.१२.२०२२ या दिवशी माझा खोकला पूर्ण नाहीसा झाला आहे’, असे मला जाणवले. ‘३१.१२.२०२२ या दिवसापर्यंत मला जे शारीरिक त्रास होते. ते सर्व त्रास ‘नामजप केल्यामुळे दूर झाले आहेत’, असे मला जाणवले. त्यासाठी ईश्वर आणि गुरु यांच्या चरणी कृतज्ञता !

१ आ. मला समाजातील लोकांप्रती अधिक प्रेम आणि आदर वाटू लागला आहे.

१ इ. चुकांचे प्रमाण न्यून होऊन कार्य जलद गतीने होणे :  घरातील कामे, नोकरी, किंवा सेवा करतांना माझ्याकडून पुष्कळ चुका होत असत. आता माझ्याकडून होणार्‍या चुकांचे प्रमाण न्यून होऊन कार्य जलद गतीने होते आणि त्यात यशही मिळते.

१ ई. घरातील जेवण चविष्ट लागणे आणि मन प्रसन्न होणे : पूर्वी मला घरातील जेवण आवडत नव्हते. माझे पत्नीशी त्या संदर्भात भांडण होत होते. आता मला पत्नी करत असलेले जेवण पुष्कळ चविष्ट लागते आणि माझे मन प्रसन्न होते.

१ उ. पती-पत्नीमधील भांडणे बंद होणे : पूर्वी लहान-सहान गोष्टींवरूनही आम्हा पती-पत्नीमध्ये भांडणे होत होती. मी नामजपाला आरंभ केल्यावर आता आमच्यात भांडणे होत नाहीत.

१ ऊ. मनातील वासनेचे विचार न्यून होणे : माझ्या मनात पूर्वी वासनेशी संबंधित विचार येत होते. आता माझ्या मनात वासनेचे विचार येण्याचे प्रमाण न्यून झाले आहे.

१ ए. अहं न्यून होणे : ‘मला मान मिळावा’, हा माझ्यातील अहंचा पैलू न्यून झाला आहे. माझ्यात अहं जागृत झाल्यास त्याच क्षणी मला त्याची जाणीव होते आणि मी अहं न्यून होण्यासाठी ईश्वराला प्रार्थना करतो.

१ ऐ. ‘माझी भौतिक वस्तूंविषयी आसक्ती न्यून झाली आहे’, असे मला जाणवते.

१ ओ. उत्तरदायी साधकांनी शंकेचे निरसन केल्यावर समाधान वाटणे आणि मनात शंका आल्यास कोणत्या तरी माध्यमातून उत्तर मिळणे : प्रथम नामजप आरंभ केल्यानंतर माझ्या मनात पुष्कळ प्रश्न आणि शंका येत होत्या. उत्तरदायी साधकांनी माझ्या शंकेचे निरसन केल्यावरच माझ्या मनाला समाधान वाटत असे. नंतर एखादी शंका निर्माण झाल्यास त्या शंकेचे निरसन कोणत्या तरी माध्यमातून होते आणि मला आपोआपच उत्तर मिळते. ‘हे केवळ गुरुकृपेमुळेच शक्य झाले आहे’, असे माझ्या लक्षात येते. श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !

२. आलेल्या अनुभूती

२ अ. नामजपामुळे माझ्या मनातील अनावश्यक विचार न्यून होऊन मनाची एकाग्रता वाढून मनाला शांत वाटते. माझे मन दिवसभर प्रसन्न आणि चैतन्यमय असते.

२ आ. ‘माझ्यामध्ये धैर्य आणि संयम वाढला आहे’, अशी मला अनुभूती येते.

२ इ. झोपेत वाईट स्वप्ने पडण्याचे बंद होणे : मला पूर्वी झोपेत अत्यंत वाईट स्वप्ने सतत पडत होती. मी नामजपाला आरंभ केल्यानंतर काही दिवसांतच मला वाईट स्वप्ने पडणे पूर्णपणे बंद झाले आहे.

२ ई. ईश्वराचे स्मरण करतांना आणि ध्यानावस्था संपल्यावर माझी भावजागृती होते अन् माझ्या डोळ्यांत अश्रू येतात.

२ उ.‘दत्तजयंती कधी आहे’, हे ठाऊक नसतांना दत्तजयंतीच्या ३ दिवस आधीपासून आपोआप दत्ताचा नामजप चालू होणे : माझा कुलदेवतेचा नामजप श्वासाच्या समवेत होतो. २३.१२.२०२३ या दिवसापासून आपोआपच माझ्याकडून कुलदेवतेच्या नामजपाऐवजी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप मधूनच चालू होऊन तो पुष्कळ एकाग्रतेने होऊ लागला. नंतर माझ्या लक्षात आले, ‘२६.१२.२०२३ या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे दत्तजयंती आहे. माझी भावजागृती होऊन माझ्या शरिरावर रोमांच आले. माझी श्री दत्तगुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. विवेक कुमार, फरीदाबाद, हरियाणा (एप्रिल २०२४)

 येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक