माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद
ठाणे – राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह ७ जणांविरोधात खंडणीप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांनी ‘अवैध तपास करून मला आणि इतर व्यवसायिकांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देऊन आमच्याकडून पैसे उकळले’ असे या तक्रारीत म्हटले आहे. मे २०२१ ते ३० जून २०२४ या कालावधीत हा गुन्हा घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मुंबई येथे व्यावसायिक संजय पुनमिया यांच्या विरोधात यू.एल्.सी.च्या सवलतीसाठी महापालिकेकडून बनावट प्रमाणपत्रे मिळवल्याचा आणि शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा वर्ष २०१६ मध्ये नोंद होता. हे प्रकरण वर्ष २०२१ मध्ये पुन्हा उघडण्यात आले होते. हे खोटे प्रकरण पुन्हा उघडून राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी या प्रकरणात खोट्या पद्धतीने अडकवण्याची धमकी देऊन पैसे उकळल्याचा आरोप पुनमिया यांनी केला आहे.