फेरफार प्रलंबित राहिल्याने तरुणाकडून तलाठ्यांचा खून !
आडगाव रंजेबुवा (हिंगोली) येथील घटना !
हिंगोली – जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगाव रंजेबुवा येथील तलाठी कार्यालयात फेरफार प्रलंबित राहिल्याने तलाठी संतोेष पवार यांच्या डोळ्यांत मिरची पावडर फेकून आणि चाकूने भोसकून त्याचा खून करण्यात आला. ही घटना २८ ऑगस्ट या दिवशी दुपारी १२.३० वाजता घडली. बोरी सावंत येथील एक तरुण कार्यालयात येऊन त्याने तलाठ्यांशी फेरफारावरून वाद घातला. त्याने त्यांच्यावर अचानक चाकूने आक्रमण केले. पोटात चाकूचे वार झाल्यामुळे तलाठी पवार अतीरक्तस्राव होऊन जागेवरच कोसळले. तरुण दुचाकीने पसार झाला. गावकर्यांनी पवार यांना रुग्णालयात उपचारासाठी भरती केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
संपादकीय भूमिकावादातून थेट हत्या केली जाणे म्हणजे समाजाने हिंसकतेचे टोक गाठल्याचेच लक्षण ! |