भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडेगुरुजी यांच्याविषयी साधकाला जाणवलेली सूत्रे !
१. सु.ग. शेवडेगुरुजी यांनी संतपद प्राप्त केले असल्याचे वाटणे
‘काही दिवसांपूर्वी भारताचार्य सु.ग. शेवडेगुरुजी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात रहायला आले. ते मला भोजनकक्षात दिसले, त्याच वेळी मला वाटले, ‘हे संत आहेत !’
२. संतसोहळ्याच्या निमित्ताने साधकाला आलेल्या अनुभूती
पू. शेवडेगुरुजी संतपदावर आरूढ झाल्याचे घोषित करणारा समारंभ ११.६.२०२४ या दिवशी झाला. मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. कार्यक्रमाच्या १ तास आधी माझ्या मनात आपोआप प.पू. बाबांचे (सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे) भजन म्हटले जाऊ लागले. चित्रीकरणकक्षात गेल्यानंतर माझा नामजप चालू झाला. संपूर्ण संतसोहळा पुष्कळ आनंददायी होता.
३. वयोवृद्ध असूनही पू. शेवडेगुरुजी यांचे वक्तृत्व अमोघ आणि तेजस्वी असणे
पू. शेवडेगुरुजी यांनी प्रवचनाला आरंभ करताच अल्पावधीतच मला डोंबिवली येथे वर्ष २००६ मध्ये ते एका जाहीर सभेला आले होते, तेव्हाचे त्यांचे वक्तृत्व आठवले. इतकी वर्षे उलटूनही त्यांच्या बोलण्यात अडखळणे अजिबात नव्हते. खणखणीत आणि मोकळ्या आवाजात स्पष्ट बोलणे, छोटी वाक्ये, ‘श्रोत्याला प्रत्येक वाक्यागणिक पुढचे वाक्य काय असेल ?’, याची उत्कंठा सतत ठेवणारी मांडणी, चपखल शब्दयोजना, सोपेपणा, ओजस्वीपणा, असे सर्व ऐकायला मिळाले. वयाचा वक्तृत्वावर काही परिणाम झालेला दिसला नाही, हे विशेष !
– आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत (वय ६३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.६.२०२४)
या लेखात/ कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या/सद् गुरुंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |