आध्यात्मिक बना आणि आध्यात्मिकता संपादन करा !
मनुष्याच्या ठायी वास करणार्या त्या अंतःस्थ सत्तेच्या तुलनेने सर्वकाही गौण आहे. ही सत्ता, म्हणजेच आध्यात्मिकता होय. या आध्यात्मिकतेचा मनुष्यामध्ये जेवढा अधिक विकास होईल, तेवढा तो अधिक सामर्थ्यशाली बनेल आणि त्याचे हे सामर्थ्य शेवटपर्यंत टिकेल; म्हणून आधी आध्यात्मिक बना आणि आध्यात्मिकता संपादन करा. धर्म म्हणजे केवळ शब्द, नावे वा संप्रदाय नव्हे, तर धर्म, म्हणजे आध्यात्मिक अनुभूती होय, हे तुम्ही आपल्या जीवनाने दाखवून द्या.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)