Youtube Banned Francois Gautier Channel : प्रसिद्ध फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतिए यांच्या यू ट्यूब चॅनलवर बंदी !
यू ट्यूबच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा दावा
नवी देहली – प्रख्यात फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतिए यांच्या यूट्यूब चॅनेलवर यू ट्यूबकडून बंदी घालण्यात आली आहे. यू ट्यूबच्या मार्गदर्शक तत्त्वांचे कथित उल्लंघन केल्यामुळे त्यांचे चॅनल काढून टाकण्यात आले. त्यांचे चॅनल हटवण्याच्या निर्णयाविषयी यू ट्यूबकडून कोणतेही तपशीलवार स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. या घटनेवरून सामाजिक माध्यमांतून टीका होत आहे. ‘यू ट्यूबची ही कृती एका व्यापक कटाचा भाग आहे’, असा आरोप केला जात आहे. विशिष्ट विचारसरणींवर टीका करणारी सामग्री, विशेषत: डाव्या विचारसरणीच्या संदर्भात असहमत असलेली सामग्री प्रसारित करणार्यांवर कारवाई केली जात आहे, असे म्हटले जात आहे.
Francois Gautier Youtube Channel: Famous French journalist Francois Gautier’s YouTube channel has been banned!
Due to alleged Violation of YouTube Guidelines
This action has been taken against Francois Gautier as he is a staunch devotee of Hinduism and a lover of Sanatan Dharma… pic.twitter.com/b2zeZAEKto
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 28, 2024
वर्ष २०२१ मध्ये निलंबित करण्यात आले होते ट्विटर खाते !
मार्च २०२१ मध्ये कथित सामाजिक कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग आणि तिची सहकारी दिशा रवि यांच्यावर केलेल्या टीकेनंतर गोतिए यांचे ट्विटर खाते निलंबित करण्यात आले होते. थनबर्ग यांचे ‘टूलकिट’ (एखाद्या प्रकरणात मोठ्या स्वरूपाची आंदोलन करतांना त्याचा कृती आराखडा), ज्यामध्ये भारताविरुद्ध खलिस्तानी सहभागाच्या संदर्भात टिप्पणी केली होती, त्यावर टीका केल्यानंतर हे निलंबन करण्यात आले होते.
संपादकीय भूमिका
|