Karnataka Rape Cases : कर्नाटकात गेल्या ७ महिन्यांत बलात्काराच्या तब्बल ३४० प्रकरणांची नोंद !
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक राज्यात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. राज्यात गेल्या ७ महिन्यांत बलात्काराची तब्बल ३४० प्रकरणे नोंदवली गेली असल्याची माहिती समोर आली आहे.
🛑A staggering 340 rape cases have been reported in Karnataka in the last 7 months!
👉Is it wrong to say that this situation has arisen because the #Congress government is in power in #Karnataka ?#CrimesAgainstWomen #CrimesAgainstHumanity #WomensRightsAreHumanRights… pic.twitter.com/OMmRyTFVxz
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 29, 2024
यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, भ्रष्टाचार आणि पक्षपाती कारभार करणार्या काँग्रेस सरकार सत्तेत असतांना ७ महिन्यांत ३४० बलात्काराची प्रकरणे नोंदवली जाणे हे गंभीर परिस्थितीचे संकेत आहेत. कर्नाटक हे बलात्कारांचे राज्य बनत आहे आणि मुलींसाठी असुरक्षित ठिकाण म्हणून ओळखले जात आहे. ‘कर्नाटक ही महान शिवशरणी अक्कमहादेवींची, कित्तूरची राणी चेन्नम्मा, ओणके ओबव्वा, केळदी चेन्नम्मा, बेळवडी मल्लम्मा, राणी अब्बक्का अशा वीर महिलांनी शौर्य गाजवलेली पवित्र भूमी आहे’, असे बोलायला लाज वाटावी अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. महिलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या सरकारने आत्मपरीक्षण करावे. कन्नड भूमीत, जिथे भगव्या रंगाचा ध्वज आहे, अशा ठिकाणी महिलांवर होणारे अत्याचार संपूर्ण राज्याचे शरमेने मस्तक खाली झुकवणारे आहेत, अशी टीका त्यांनी केली.
संपादकीय भूमिकाकर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे, असे म्हटल्यास चुकीचे काय ? |