Jodhpur Gangrape : जोधपूर (राजस्थान) येथील वैद्यकीय महाविद्यालय परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार !
जोधपूर (राजस्थान) – येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी २ आरोपींना कह्यात घेतले आहे. दोघेही आरोपी रुग्णालयात कंत्राटी तत्त्वावर सफाई कर्मचारी म्हणून काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. कोलकातामध्ये ‘राधा-गोविंद’ (आर्.जी) कर वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात डॉक्टर तरुणीवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे देशात संतापाचे वातावरण असतांनाच जोधपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.
Jodhpur: 15-Year-Old Girl allegedly Gang-Raped at Mahatma Gandhi Government Hospital.
Two suspects have been detained
Enough is Enough #SaveOurDaughters #CrimesAgainstWomen pic.twitter.com/hu2HhI1VWY
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 28, 2024
१. या सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे जोधपूर शहर हादरल्यानंतर आता विरोधकांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे. राजस्थानमध्ये ‘जंगल राज’ चालू असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.
२. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार, २५ ऑगस्ट या दिवशी पीडित मुलीचे आईशी भांडण झाले होते. त्यानंतर ती रुग्णालयाच्या उपाहारगृहामध्ये गेली होती. उपाहारगृहामध्ये मुलगी एकटी असल्याचे हेरून दोन्ही आरोपींनी तिचा विश्वास संपादन केला. त्यांनी तिला रुग्णालयाच्या मागील डम्पिंग यार्डमध्ये नेले. तिथे पीडितेवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर दोघांनीही तिथून पळ काढला. सायंकाळपर्यंत मुलगी घरी न परतल्यामुळे पालकांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली.
३. प्रतापनगरचे साहाय्यक पोलीस आयुक्त अनिल कुमार यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देतांना सांगितले की, मुलीच्या पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अन्वेषण चालू केले असता मुलीवर बलात्कार झाल्याचे समजले. घटनास्थळावरून न्यायवैद्यक शास्त्र पथकाने पुरावे गोळा केले आहेत. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.