Muslim Protest Against Ramgiri Maharaj : डेहराडून (उत्तराखंड) येथे रामगिरी महाराजांच्या विरोधात मुसलमानांकडून आंदोलन
महाराजांना अटक करण्यासह ईश्वर निंदेच्या विरोधात कायदा करण्याची मागणी
डेहराडून (उत्तराखंड) – महाराष्ट्रातील नाशिक येथील कार्यक्रमात रामगिरी महाराजांनी महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्याचा आरोप मुसलमानांकडून केला जात आहे. येथे शेकडो मुसलमानांनी रामगिरी महाराजांच्या विरोधात आंदोलन केले. रामगिरी महाराजांना अटक करून कारागृहात टाकण्याची मागणी केली.
Dehradun, 1500 km away from Nashik!
Yet these thousands of people have assembled to denounce what #Ramgiri Maharaj has said. The aged maulana in the video is instigating people to take law in their hands.
On the contrary, we Hindus laugh when our Hindu Devatas are mocked,… pic.twitter.com/9AsMDxATe5
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 26, 2024
तसेच देशात ईश्वर निंदेच्या संदर्भात कायदा करण्यासाठी मुसलमानांकडून ३ महिन्यांचा मुदत केंद्र सरकारला देण्यात आली. ‘कालमर्यादेत कायदा आणला नाही, तर काहीतरी केले जाईल’, अशी धमकीही या वेळी देण्यात आली. महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसलमानांनी यापूर्वीच रामगिरी महाराजांच्या विरोधात आंदोलन केले आहे.
डेहराडूनच्या परेड ग्राऊंडवर मुसलमानांकडून हे आंदोलन करण्यात आले. मुसलमान सेवा संघटना, जमियत उलेमा-ए-हिंद आणि इमाम-ए-रिसालत या संघटनांनी हे आंदोलन आयोजित केले होते. याला ‘शान-ए-रिसालत’ असे नाव देण्यात आले. यात उत्तराखंडचे अनेक मौलाना आणि मुफ्ती सहभागी झाले होते.
संपादकीय भूमिकास्वतःच्या धार्मिक श्रद्धांचा कथित अवमान झाल्यावरून देशभरात संघटित होऊन आंदोलन करणार्या मुसलमानांकडून हिंदू काही शिकतील का ? |