अंजली दमानिया यांची राष्ट्रवादी काँग्रेसला नोटीस !
मुंबई – सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि या पक्षाचे नेते सुरज चव्हाण यांना २७ ऑगस्ट या दिवशी मानहानीची नोटीस पाठवली आहे. याविषयी स्वत:च्या ‘एक्स’ खात्यावरून याविषयीची माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे. अजित पवार यांच्या गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सूरज चव्हाण यांनी अंजली दमानिया यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या प्रकरणाची न्यायालयीन लढाई आरोपींना शिक्षा मिळेपर्यंत लढणार असल्याचेही दमानिया यांनी म्हटले आहे.