पाकिस्तानातील हिंदूंवरील होणार्या अत्याचारांवर संयुक्त राष्ट्रे काहीतरी करतात; मात्र भारत स्वतः काय करतो ?
‘संयुक्त राष्ट्रांच्या ‘जातीय भेदभाव निर्मूलन समिती’ने (‘सी.ई.आर्.डी.’ने) तिच्या अहवालात मे ते जून २०२४ या कालावधीत पाकिस्तानच्या पंजाब आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतांमधील अल्पसंख्यांकांवर होणार्या अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे म्हटले आहे, तसेच या कालावधीत जमावाने केलेल्या अल्पसंख्यांकांच्या हत्या आणि प्रार्थनास्थळांची नासधूस यांच्या घटनांमध्येही वाढ नोंदवली. समितीने पाकिस्तानला अल्पसंख्यांकांना संरक्षण देण्याचे आवाहन केले आहे, तसेच ‘अल्पसंख्यांकांच्या मुळावर उठणारा ईशनिंदा कायदा रहित करावा, निष्पक्ष चाचणी सुनिश्चित करावी आणि हिंसाचार करणार्यांवर खटला चालवावा’, असे आवाहन केले आहे.’ (२६.८.२०२४)