वर्ष २०२१ मधील गोकुळाष्टमीच्या दिवशी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा नामजप ऐकतांना देहली सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती !
‘३०.८.२०२१ या गोकुळाष्टमीच्या दिवशी देहली येथील सनातनच्या सेवाकेंद्रात ध्वनीक्षेपकावर ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा नामजप लावल्यावर तो ऐकतांना साधकांना काय जाणवते ?’, असा प्रयोग करण्यात आला. त्या वेळी साधकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. त्रासदायक अनुभूती (ज्या साधकांना अनिष्ट शक्तींचा त्रास आहे, त्यांना त्रासदायक अनुभूती येतात.)
१ अ. कु. पूनम चौधरी
१. ‘नामजप ऐकू नये आणि तेथून उठून निघून जावे’, असे मला वाटत होते. अधूनमधून मला होणार्या वेदनांत वाढ होत होती.’
१ आ. कु. मनीषा माहूर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय २९ वर्षे)
१. ‘माझ्या आज्ञाचक्रावर थोडासा दाब जाणवत होता.
२. माझ्या मनात पुष्कळ विचार येत होते.
३. ‘नामजप अंतर्मनात जात आहे आणि मनातील विचार बाहेर निघून जात आहेत’, असे मला जाणवले.’
१ इ. श्री. कार्तिक साळुुंंके
१. ‘नामजप ऐकण्यापूर्वी माझे डोके आणि शरीर पुष्कळ जड झाले होते.
२. नामजप चालू झाल्यावर मला माझ्या डोळ्यांसमोर समुद्र आणि त्यात उमटणार्या लाटा दिसत होत्या. प्रत्येक लाट शांतपणे वहात होती.
३. काही वेळानंतर ‘माझ्या आज्ञाचक्रातून काहीतरी निघत आहे आणि समुद्राच्या लाटा त्याला आपल्यामध्ये खेचून घेत आहेत’, असे मला जाणवत होते अन् तसे दृश्यही दिसत होते.४. नामजपानंतर माझ्या डोक्याचा जडपणा ७० टक्के न्यून झाला आणि माझे मन शांत झाले.’
१ ई. श्री. अशोक भागवत
१. ‘मला माझ्या छातीवर, म्हणजे अनाहतचक्राच्या २ – ३ बोटे वर दाब जाणवला.
२. ‘जशा सागरात लाटा उसळत पुढे पुढे जातात, तसे काहीतरी प्रवाहित होत आहे’, असे मला जाणवत होते. मला श्वास घेण्यासही कठीण होत होते.
३. पुन्हा एकदा वरीलप्रमाणे त्रासदायक जाणवले; परंतु या वेळी दाबाचे प्रमाण अल्प होते.
४. काही वेळानंतर मला शांत आणि हलके जाणवले.’
१ उ. श्री. प्रणव मणेरीकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४४ वर्षे)
१. ‘नामजप करतांना मला चांगले वाटले; पण माझ्या मनात इतर विचार आले आणि शेवटी मला झोप आली.’
२. चांगल्या अनुभूती
२ अ. श्री. प्रथमेश वाळके
१. ‘मला हलकेपणा जाणवला. माझा जप एकाग्रतेने झाला.’
२ आ. श्री. गिरीष रघोजीवार
१. ‘आरंभी मला आनंद मिळाला. २ मिनिटांनंतर माझ्या मनाची एकाग्रता न्यून झाली आणि मला नामजपाच्या नादातील मधुरता अनुभवता आली.’
२ इ. सौ. केतकी येळेगावकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५५ वर्षे)
१. ‘जेव्हा नामजप चालू झाला, तेव्हा तो माझ्या सर्व चक्रांतून वर जात सहस्रारचक्रापर्यंत गेला. त्या वेळी ‘तेथील शुद्धी होत आहे’, असे मला जाणवले.
२. माझ्या मनात शरणागतभाव होता आणि मनात कोणताही विचार नव्हता.’
२ ई. श्री. आनंद नटवरलाल जाखोटिया (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ३८ वर्षे)
१. ‘प्रारंभी जप ऐकतांना ‘माझा उत्साह आणि क्रियाशीलता वाढली आहे’, असे मला जाणवले. पुढे पुढे उत्साह तसाच होता; पण माझी क्रियाशीलता न्यून होऊन मला स्थिरता जाणवली. ‘प्रारंभी माझ्यातील सत्त्व-रज गुण वाढला आणि नंतर सत्त्वगुण वाढला’, असे मला जाणवले.’
२ उ. सौ. प्रीती आनंद जाखोटिया
१. ‘माझ्या मनातील विचार न्यून झाले.
२. ‘नामजपाची स्पंदने नागमोडी आहेत’, असे मला जाणवले.
३. ‘नामजप म्हणणारी साधिका झुल्यावरच्या कृष्णाला झोका देत आहे’, असे मला जाणवले.
४. त्यानंतर ‘नामजप म्हणणारी साधिका पाळण्यातील बाळकृष्णाचा पाळणा हलवत नामजप करत आहे’, असे मला जाणवले.
५. नामजप ऐकतांना मला आनंद वाटत होता.
|