‘न्यू एरा शिक्षण संस्थे’चा संबंध पाकमधील आतंकवादी संघटनेशी असण्याविषयी चौकशी करा !
|
सांगली, २७ ऑगस्ट (वार्ता.) – सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथील ‘नू एरा शिक्षण संस्थेच्या’ जागेच्या कागदपत्रात ‘पाकिस्तान’ असा उल्लेख आढळतो. ही संस्था मुसलमान संचालक मंडळाची असून या संस्थेच्या कागदपत्रांत पाकिस्तानचा उल्लेख कसा काय आणि तो कुणी केला ? प्रशासन या संदर्भात काय करणार आहे ? या शिक्षण संस्थेतील मुसलमान संचालक मंडळ हे पाकिस्तानातील आतंकवादी संघटनांशी संबंधित आहे का ? याची चौकशी करावी, अशी मागणी ‘हिंदु एकता आंदोलना’चे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी केली आहे. पाकपुरस्कृत आतंकवाद्यांशी लढून अनेक भारतीय सैनिक धारातीर्थी पडत असतांना भारतातील ‘न्यू एरा शिक्षण संस्थेच्या’ कागदपत्रातील ‘पाकिस्तान’चा उल्लेख कदापि खपवून घेतला जाणार नाही, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे.