पनवेल येथे ‘पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती विक्री केंद्र’ चालू !
|
पनवेल – पनवेल महापालिका क्षेत्रात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा’ उपक्रमांतर्गत ‘पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती विक्री केंद्र’ येथे चालू करण्यात आले आहे. येथे पर्यावरणपूरक शाडूमातीच्या मूर्ती माफक दरात मिळतील. अधिकाधिक नागरिकांनी या केंद्रास भेट देऊन श्री गणेशमूर्ती खरेदी कराव्यात, असे आवाहन महापालिकेने केले आहे. गिरीधर मूर्ती प्रशिक्षण आणि कलाकेंद्र, श्री गणेश कलाकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मूर्तीकारांनी सिद्ध केलेल्या मूर्ती विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.