पुणे शहरात २ दिवसांमध्ये १३ दुचाकींची चोरी !

चोरांना पोलिसांचे भय नसल्याचे उदाहरण !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – केवळ २ दिवसांमध्ये शहरांमधील विविध भागांतून १३ दुचाकी गाड्यांची चोरी झाल्याची नोंद पोलीस ठाण्यांमध्ये झालेली आहे. हडपसर, बंडगार्डन, विश्रामबाग, भारती विद्यापीठ, अलंकार आणि येरवडा पोलीस ठाण्यात २५ ऑगस्टला ७ दुचाकींच्या चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. २६ ऑगस्टला काही पोलीस ठाण्यांमध्ये ६ दुचाकी चोरीचे गुन्हे नोंद केले आहेत. घराजवळ, सोसायटी किंवा कार्यालयाच्या बाहेर उभ्या केलेल्या गाड्या चोरीला गेल्या आहेत.