India US On Bangladeshi Hindus : पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष बायडेन यांच्‍यात दूरभाषवरून बांगलादेशातील हिंदूंच्‍या सुरक्षेवर चर्चा

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी २६ ऑगस्‍टच्‍या रात्री अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष जो बायडेन(Joe Biden) यांच्‍याशी दूरभाषवर चर्चा केली. दोन्‍ही नेत्‍यांनी युक्रेन आणि बांगलादेश येथील स्‍थितीविषयी चर्चा केली.

पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनमधील शांतता आणि स्‍थैर्य यांसाठी भारताच्‍या समर्थनाचा पुनरुच्‍चार केला. तसेच बांगलादेशातील परिस्‍थिती लवकरच सामान्‍य करण्‍यावर दोघांनी भर दिला. बांगलादेशातील कायदा आणि सुव्‍यवस्‍था लवकरात लवकर पूर्ववत् करण्‍यावर आणि अल्‍पसंख्‍यांकांची, विशेषत: हिंदूंची सुरक्षा सुनिश्‍चित करण्‍यावर भर दिला.

संपादकीय भूमिका

  • बांगलादेशातील हिंदूंचा वंशसंहार होत आहे. त्‍यामुळे केवळ चर्चा नको, तर प्रत्‍यक्ष कृती करण्‍याची आवश्‍यकता आहे !
  • भारताने बांगलादेशातील हिंदूंच्‍या सुरक्षेसाठी अमेरिकेशी चर्चा करण्‍याची काय आवश्‍यकता ? उद्या भारतातील हिंदूंच्‍याही सुरक्षेसाठी भारत अमेरिकेशी चर्चा करणार आहे का ? भारताने बांगलादेशातील हिंदूंच्‍या सुरक्षेसाठी स्‍वतःहून पुढाकार घेतला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !