यवतमाळ येथे गोमातेवर लैंगिक अत्याचार करणार्या धर्मांधास अटक !
धर्मांयवतमाळ, २७ ऑगस्ट (वार्ता.) – येथील संजय गांधी नगर, भोसा परिसरात गोमातेवर लैंगिक अत्याचार करणार्या शेख आवेश शेख जमीर (वय २० वर्षे) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला कह्यात घेण्यात आले आहे. भोसा परिसरातील गायींवर लैंगिक अत्याचार होत असल्याची माहिती जागरूक नागरिकांनी दिली होती. स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. ‘हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या धर्मांधाला कठोरात कठोर शिक्षा करावी’, अशी मागणी हिंदूंनी केली आहे.
संपादकीय भूमिकाधर्मांधांच्या वासनांधतेची परिसीमा जाणा ! हिंदूंसाठी पूजनीय असणार्या गोमातेवर लैंगिक अत्याचार करणार्या धर्मांधांना आजन्म कारावासात डांबण्याची शिक्षाच करायला हवी ! |