शिरूर (पुणे) येथील कॅफेवर पोलिसांची कारवाई
शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना अश्लील वर्तनाची कॅफेमध्ये मुभा
शिरूर (जिल्हा पुणे) – येथील शाळेतील आणि महाविद्यालयातील मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी मुभा देणार्या ‘१० इलेव्हन कॅफे’वर शिरूर पोलिसांनी कारवाई केली. (असे कॅफे कायमस्वरूपी बंद करून त्यांची सर्व मालमत्ता जप्त केल्याविना इतरांवर जरब बसणार नाही ! – संपादक) कॅफेचालक सौरभ पवार यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयी पोलीस शिपाई नीलेश थोरात यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. या कॅफेचालकाने कॅफेमध्ये स्वतंत्र छोटी-छोटी दालने (पार्टीशन) सिद्ध केली आहेत. शाळा आणि महाविद्यालयातील मुले-मुली हे असभ्य अन् अश्लील वर्तन करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. साध्या वेषातील पोलिसांनी जाऊन पडताळणी केली असता असे प्रकार घडत असल्याचे लक्षात आल्यानंतर कॅफेवर कारवाई करण्यात आली.