साहील डफेदार याला फाशीची शिक्षा होईपर्यंत हिंदुत्वनिष्ठ संघटना गप्प बसणार नाहीत ! – नितीन शिंदे, माजी आमदार
खंडेराजुरी (सांगली) येथील ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातून आत्महत्या केलेल्या मुलीच्या कुटुंबियांचे सांत्वन !
मिरज (जिल्हा सांगली), २६ ऑगस्ट (वार्ता.) – मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथील मराठा समाजातील महाविद्यालयीन तरुणी कु. स्वाती रामचंद्र जाधव हिला एकतर्फी प्रेमातून त्याच गावातील साहील डफेदार हा त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून ४ दिवसांपूर्वी त्या तरुणीने आत्महत्या केली. या प्रकरणी धर्मांध साहील याला फाशीची शिक्षा होण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे मागणी करणार आहोत. जोपर्यंत या नराधमाला फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना गप्प बसणार नाहीत, अशी चेतावणी ‘हिंदु एकता आंदोलना’चे अध्यक्ष आणि माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी दिली.
श्री. नितीन शिंदे यांनी २५ ऑगस्ट या दिवशी खंडेराजुरी येथील स्वाती यांच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख श्री. विकास सूर्यवंशी, सर्वश्री दिनकर भोसले, अक्षय माने, अशोक बने, विष्णुपंत पाटील, ‘अखिल भारतीय मराठा महासंघा’चे श्री. विलास देसाई यांसह अखिल भारतीय मराठा महासंघ, हिंदु एकता आंदोलन, भाजप, शिवसेना, ‘आम्ही शिवभक्त संघटने’चे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
धर्मांध साहील याच्यावर कठोर कारवाई होण्यासाठी खंडेराजुरी बंद !
श्री. नितीन शिंदे यांनी खंडेराजुरी येथील स्वाती यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर गावकर्यांनी २६ ऑगस्ट या दिवशी ‘निषेध मोर्चा’ काढून ‘खंडेराजुरी बंद’चे आवाहन केले आहे. त्यानुसार गावात गावकर्यांनी ‘निषेध मोर्चा’ काढून खंडेराजुरी बंद केले. |
स्वाती खंडेराजुरी ते मिरज येथील महाविद्यालयापर्यंत ये-जा करत असतांना साहील हा तिला त्रास देत होता. २-३ वेळा मराठा समाजातील कुटुंबांनी डफेदार कुटुंबियांना या त्रासाविषयी कल्पना दिली होती. तरीही साहील हा स्वाती हिला त्रास देतच होता. या मानसिक तणावातून स्वाती हिने आत्महत्या केली आहे.
नितीन शिंदे पुढे म्हणाले की, साहील डफेदार याच्या अतिक्रमण केलेल्या घरावर बुलडोझर फिरवावा, आदी मागण्या आम्ही करणार आहोत. जाधव कुटुंबियांनी समाजामध्ये अब्रू जाईल या भीतीपोटी पोलीस ठाणे अथवा सामाजिक संघटना यांना माहिती दिली नाही. याचा परिणाम त्यांना स्वत:ची एक मुलगी गमवावी लागली. यापुढे मराठा समाजाने अशा गोष्टी लपवून ठेवू नये, वेळीच कल्पना द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
संपादकीय भूमिका :लव्ह जिहादमुळे किती हिंदु मुलींनी आत्महत्या केल्यावर आणि त्यांच्या हत्या झाल्यावर प्रशासन कठोर पावले उचलणार ? |