बदलापूर आणि डोंबिवली येथील मनसेची दहीहंडी रहित !
डोंबिवली – बदलापूर येथील २ बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बदलापूर आणि डोंबिवली येथील त्यांचे दहीहंडी उत्सव रहित करण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद उपाख्य राजू पाटील यांनी सांगितले.
मनसेच्या डोंबिवलीतील पदाधिकार्यांनी शहर परिसरातील शाळांमध्ये जाऊन शाळा व्यवस्थापनासाठी ‘मुलींच्या सुरक्षिततेविषयी घ्यावयाची काळजी’ याविषयी जनजागृती मोहीम चालू केली आहे. प्रत्येक शाळेला एक छापील पत्रक देऊन मनसे पदाधिकारी त्या नियमांची काटेकोर कार्यवाही शाळा व्यवस्थापनाने करावी म्हणून प्रयत्न करत आहेत.