‘लाडकी बहीण योजने’पेक्षा ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा बनवण्याची आवश्यकता ! – पू. स्वामी भारतानंद सरस्वती महाराज
विश्व हिंदु परिषदेच्या षष्ठ्यपूर्ती वर्षानिमित्त सीबीडी, नवी मुंबई येथे पार पडले हिंदु संमेलन !
नवी मुंबई, २५ ऑगस्ट (वार्ता.) – राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ चालू केली आहे; मात्र राज्यातील सध्याची परिस्थिती पहाता मुलींच्या सुरक्षेसाठी ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा लवकरात लवकर सिद्ध करण्याची अधिक आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पालघर येथील हिंदु शक्तीपिठाचे पू. स्वामी भारतानंद सरस्वती महाराज यांनी सीबीडी येथे केले. ते विश्व हिंदु परिषदेच्या षष्ठ्यपूर्ती वर्षानिमित्त सीबीडी येथे आयोजित हिंदु संमेलनात बोलत होते.संमेलनाचे प्रास्ताविक विश्व हिंदु परिषदेचे नवी मुंबई सहमंत्री स्वरूप पाटील यांनी केले.
घुसखोरांना शोधून काढा ! – पू. स्वामी भारतानंद सरस्वती महाराजसरकार जोपर्यंत लव्ह जिहादविरोधी कायदा बनत नाही, तोपर्यंत मुली आणि महिला यांनी त्यांच्या पर्समध्ये शस्त्र ठेवावे; कारण कायद्याने आत्मरक्षण (स्वत:चे रक्षण) करण्याचा अधिकार दिला आहे. भारतात ठराविक समाजाची लोकसंख्या हिंदूंपेक्षा अधिक प्रमाणात वाढत आहे. यात आणखी भर म्हणजे सध्या देशात १० कोटी घुसखोर आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी जनसंख्या नियंत्रण कायदा संमत करणे आवश्यक आहे; मात्र सध्या हे होणे शक्य नाही. त्यासाठी आता सरकारचे हे काम जनतेने करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात ८० लाख घुसखोर आहेत. या जिहादी मानसिकतेच्या लोकांनी देशात मिनी पाकिस्तान, बांगलादेश सिद्ध केले आहेत. सध्या आरक्षणापेक्षा देश आणि धर्म यांचे रक्षण करण्याची आवश्यकता आहे. जात-पात, भाषा, प्रांत, संप्रदाय यांचे मतभेद बाजूला सारून हिंदु म्हणून एक यावे. |
धर्मयुद्धाच्या लढाईसाठी मातृशक्ती जागृत होणे आवश्यक ! – मनीषा भोईर, मातृशक्ती संयोजिका, कोकण प्रांत
विश्व हिंदु परिषदेच्या कोकण प्रांताच्या मातृशक्ती संयोजिका मनिषा भोईर म्हणाल्या की, ही धर्मयुद्धाची लढाई आहे. हिंदु मुलींविरुद्ध जिहाद करण्यासाठी जिहाद्यांची टोळी सिद्ध आहे. हे राज्यघटनेनुसार वागत नाहीत. ही मोगलाई संपवायची असेल, छत्रपती शिवाजी महाराज जन्मावे लागतील. त्यासाठी मातृशक्ती जागृत होणे आवश्यक आहे. प्रत्येक वेळी प्रशासनाने काही करावे, याची आपण वाट पहात बसतो; परंतु महिलांकडे वाकड्या नजरेने पहाणार्यांचा चौरंग करण्याचे आदेश छत्रपतींनी दिले होते, हे लक्षात घ्या. बांगलादेशात सूत्र आरक्षणाचे होते; मग हिंदु समाजाला लक्ष्य का केले गेले ? यासाठी हिंदूंनी संघटित होऊन जागृत झाले पाहिजे.
सर्व विसरून हिंदूंनी एकत्र आले पाहिजे ! – सूरज तिवारी, ठाणे विभाग संयोजक, बजरंग दल
बजरंग दलाचे ठाणे विभाग संयोजक सूरज तिवारी म्हणाले की, हिंदूंनी जात, संप्रदाय, संस्था एकत्र आले, तर कोणी वाकड्या दृष्टीने पाहू शकणार नाही. घराघरात जिजामाता निर्माण झाल्या, तरच, छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग जन्माला येतील. कॉन्व्हेन्टमध्ये मोगलांचा इतिहास शिकवला जात असल्याने आपल्या मुलांमध्ये धर्माभिमान कसा जागृत होईल ?, यासाठी मुलांना विश्व हिंदु परिषदेच्या गुरुकुल, बालसंस्कारवर्ग, शौर्य प्रशिक्षणवर्ग येथे पाठवा.
संपादकीय भूमिकागुन्हेगारीवरच नियंत्रण मिळवता येत नाही, तर राज्यातील ८० लाख घुसखोरांना कधी हाकलणार ? |