पू. निर्मला दातेआजी यांचे दर्शन घेतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
‘३१.७.२०२४ या दिवशी मला पू. निर्मला दातेआजी यांचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. त्या काही मासांपासून रुग्णाईत आहेत. त्यांचे दर्शन घेतांना मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. मी पू. दातेआजींच्या खोलीत जात असतांना मला मार्गिकेत पांढरा प्रकाश दिसला आणि माझे मन निर्विचार झाले.
२. पू. आजींकडे पाहिल्यावर ‘त्यांचे शरीर आणि मन वेगवेगळे आहे. त्या साक्षीभावात आहेत’, असे मला जाणवले.
३. त्यांच्या चेहर्याकडे पाहिल्यावर ‘त्यांनी स्वतःला गुरुचरणी समर्पित केले आहे’, असे मला वाटले. ‘त्यांनी उच्च कोटीचा त्याग, म्हणजे स्वतःचा देहही गुरुचरणी अर्पण केला आहे’, असे मला जाणवले.
४. त्यांचे दर्शन घेत असतांना ‘माझ्यावरील अनिष्ट शक्तीचे आवरण दूर होत आहे’, असे मला जाणवले.
‘गुरुदेवांच्या कृपेने मला पू. आजींच्या दर्शनाची संधी मिळाली आणि अनुभूती आल्या’, त्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– कु. वेदिका भागवत (आध्यात्मिक पातळी ५७ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.८.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |