सनातनच्या संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) यांच्या खोलीत गेल्यावर त्यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
‘३१.७.२०२४ या दिवशी मी सनातनच्या ४८ व्या संत पू. दातेआजी यांना भेटण्यासाठी रामनाथी आश्रमातील त्यांच्या खोलीत गेलो होतो. तेव्हा मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. पू. आजींच्या खोलीत प्रवेश करण्यापूर्वी माझा नामजप जलद गतीने होऊ लागला.
२. पू. आजींच्या खोलीत चैतन्य जाणवत होते.
३. पू. आजी पलंगावर शांतपणे पडून होत्या. त्या वयोवृद्ध असूनही मला त्यांच्या चेहर्यावर सुरकुत्या दिसल्या नाहीत. ‘त्यांच्या नाकाला नळी लावली आहे; म्हणूनच ‘त्या रुग्णाईत आहेत’, असे वाटले.
४. ‘पू. आजींची सून सौ. ज्योती नरेंद्र दाते ‘तळमळीने आणि निरपेक्ष भावाने संतसेवा करत आहेत’, असे माझ्या लक्षात आले.
५. ‘नातेवाईक किंवा समाजातील इतर रुग्ण यांना भेटण्यास गेलो, तर तेथे दाब जाणवतो अन् तेथून कधी निघतो’, असे मला होते; परंतु ‘पू. आजींच्या खोलीतून बाहेर पडूच नये’, असे मला वाटत होते.
६. ‘पू. आजी रुग्णाईत असूनही त्यांचा नामजप अखंड चालू आहे आणि ‘त्या साधकांसाठी नामजपादी उपाय करत आहेत’, असे मला जाणवले. त्या वेळी माझ्या लक्षात आले की, ‘गंभीर आजारपणातही संतांचे समष्टी कार्य अव्याहतपणे चालूच असते आणि संतांनाही शरीरभोग भोगूनच संपवावे लागतात.’
‘गुरुदेवा, तुमच्या कृपेनेच मला थोर संतांना भेटण्याची संधी मिळाली आणि तुम्ही मला अनुभूतीही दिली, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. दिलीप नलावडे (वय ६० वर्षे), फोंडा, गोवा. (६.८.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |