Assam Gangrape Case : आसाममधून बांगलादेशी घुसखोर मुसलमानांनी ७ दिवसांत हाकला अन्यथा आम्ही हाकलू ! – आसामी संघटनांची चेतावणी
आसाममधील अल्पवयीन हिंदु मुलीवर मुसलमानांनी बलात्कार केल्याचे प्रकरण
धिंग (आसाम) – येथे २२ ऑगस्ट या दिवशी इयत्ता आठवीत शिकणार्या एका अल्पवयीन हिंदु मुलीवर ३ मुसलमानांनी सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर राज्यभरात निदर्शने चालू आहेत. या निदर्शनांमध्ये सहभागी असलेल्या लोकांनी बांगलादेशी घुसखोर मुसलमानांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. निदर्शनात सहभागी असलेल्या अनेक संघटनांनी घुसखोरांना आसाममधील उत्तरेकडील भाग ७ दिवसांत सोडून निघून जाण्याचा आदेश दिला आहे. दुसरीकडे स्थानिक काँग्रेस आमदार अब्दुर रशीद मंडल यांनी या चेतावणीचा विरोध केला आहे.
Bangladeshi Mu$lim infiltrators should be expelled from Assam within 7 days, or we will do it ourselves, warns Assamese organisations
Case of a minor Hindu girl being raped by Mu$lims in Assam
Why do organisations need to issue such warnings? What are the police and… pic.twitter.com/KaN13TLE1O
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 27, 2024
पूर्व आणि उत्तर आसाममधील ३० हून अधिक संघटना बलात्कार पीडितेला न्याय देण्याची मागणी करत आहेत. ‘ताई अहोम युवा परिषद’ नावाच्या संघटनेने सांगितले की, संपूर्ण घटना घुसखोर मुसलमानांनी घडवून आणली आहे. हे मुसलमान आसामसाठी त्रासदायक बनले आहेत. बलात्कार, दरोडे, अमली पदार्थांची तस्करी अशा गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे. यामुळे लोक अतिशय नाराज आहेत. या मुसलमानांना आसाममधून बाहेर काढण्यासाठी आम्ही सरकारला ७ दिवसांची मुदत दिली आहे. दिलेल्या मुदतीत कारवाई न झाल्यास आमची संघटना बळाचा वापर करून त्यांना हाकलून देईल.
संपादकीय भूमिकाअशी चेतावणी संघटनांना का द्यावी लागते ? पोलीस आणि प्रशासन काय करतात ? |
(म्हणे) ‘घुसखोर मुसलमानांना बाहेर काढता येणार नाही !’ – काँग्रेस आमदार अब्दुर रशीद
आसाममधील काँग्रेसचे आमदार अब्दुर रशीद मंडल यांनी बांगलादेशी मुसलमान घुसखोरांना हाकलण्याच्या मागणीवर म्हटले की, आंदोलन करणारे घुसखोर मुसलमानांना बाहेर काढू शकणार नाहीत. काहींच्या चुकीसाठी प्रत्येकाला दोष देता येणार नाही. आसाममधील विविध भागात चालू असलेल्या कामात मुसलमान योगदान देत आहेत.
संपादकीय भूमिकाबांगलादेशी घुसखोरांची एकगठ्ठा मते काँग्रेसला मिळतात. त्यामुळे काँग्रेसवाल्यांनी आणि त्यातही रशीद यांच्यासारख्या मुसलमान काँग्रेसवाल्यांनी अशी विधाने केल्यास आश्चर्य ते काय ? |