Karnataka : कर्नाटकमध्ये मुसलमान तरुणाने दारू पाजून हिंदु तरुणीवर केला बलात्कार !
उडुपी (कर्नाटक) – इन्स्टाग्रामवरून ओळख झालेल्या एका मुसलमान तरुणाने २१ वर्षीय हिंदु तरुणीवर बलात्कार केल्याची घटना कर्नाटकातील उडुपी येथे घडली आहे. या तरुणीला दारू पाजून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचे कर्नाटक पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी अल्ताफ आणि काडोर्झा या २ मुसलमान तरुणांना अटक केली आहे.
१. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका खासगी आस्थापनामध्ये काम करणार्या २१ वर्षीय हिंदु तरुणीची अल्ताफ याच्याशी ३ महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर ओळख झाली.
२. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दोघे अनेकदा बोलत असत. नुकतेच अल्ताफने तिला एक जागा दाखवण्याच्या निमित्ताने एका ठिकाणी नेले. तेथे त्याने तिला दारू पाजून तिच्यावर बलात्कार केला.
भाजपकडून ‘लव्ह जिहाद’चा आरोप
भाजपचे सरचिटणीस आणि करकलाचे आमदार व्ही. सुनील कुमार म्हणाले की, राज्यात हिंदु मुलींना लक्ष्य केले जात असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. राज्य सरकार किंवा पोलीस आरोपींवर कठोर कारवाई करत नाहीत.
संपादकीय भूमिकाकर्नाटकमध्ये हिंदुद्वेषी काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर धर्मांध मुसलमान मोकाट सुटले आहेत. असे प्रकार आणखी घडल्यास आश्चर्य वाटणार नाही ! |