Baloch Liberation Army Attack : ‘बलुच लिबरेशन आर्मी’ने पाकिस्तानातील २३ पंजाबी मुसलमानांना केले ठार
इस्लामाबाद (पाकिस्तान) – बलुचिस्तान प्रांतात ‘बलुच लिबरेशन आर्मी’च्या (बी.एल्.ए.च्या) सशस्त्र सदस्यांनी त्यांचा नेता नवाब बुगती याच्या पुण्यतिथीनिमित्त २३ पंजाबी मुसलमानांना ट्रक आणि बस यांमधून बाहेर काढून ठार केले. या सदस्यांनी प्रथम ही वाहने थांबवली आणि प्रवाशांची ओळखपत्रे तपासल्यानंतर पंजाबी वंशाच्या मुसलमानांना ठार केले, असे सांगण्यात येत आहे. बी.एल्.ए.ने एक निवेदन प्रसारित करून मृतांची संख्या ६२ असल्याचा दावा केला आहे. या संघटनेने सांगितले की, नागरी कपडे घातलेले पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत. बी.एल्.ए.ने १० वाहनांना आगही लावली.