बांगलादेशातील हिंदूंच्या हत्यांच्या निषेधार्थ लातूर येथे ‘हिंदु हुंकार मोर्चा’!
|
लातूर, २५ ऑगस्ट (वार्ता.) – बांगलादेशातील हिंदूंच्या हत्या, महिला-मुली यांच्यावर होत असलेले बलात्कार आणि हिंदु धर्मस्थळांवर होत असलेली आक्रमणे यांच्या निषेधार्थ २४ ऑगस्ट या दिवशी सकल हिंदु समाजाच्या वतीने ‘हिंदु हुंकार मोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या वेळेत येथील गंजगोलाई मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला हाेता. या वेळी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे सहस्रो कार्यकर्ते भगवे ध्वज हातात घेऊन, तसेच भगव्या टोप्या परिधान करून मोर्चामध्ये सहभागी झाले होते.