पुणे येथे मुसलमानांच्या मोर्च्यात ‘सर तन से जुदा’च्या घोषणा !
पुणे – सरला गोवर्धनचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून मुसलमान समाजाकडून २५ ऑगस्ट या दिवशी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘सर्वधर्मसमभाव महामोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. या मोर्च्याला अनुमती देण्यात आली नव्हती, तरीही हा मोर्चा काढण्यात आला. या वेळी ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद करणे) आणि टिपू सुलतानच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. समाजामध्ये सार्वजनिक शांततेचा भंग होऊन असुरक्षितता आणि भितीचे वातावरण निर्माण केल्याच्या प्रकरणी ३०० जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका :छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात धर्मांध अशा घोषणा देऊ शकतात, हे पोलिसांचा धाक संपल्याचे लक्षण ! |