नायगावमध्ये येथे ७ वर्षीय चिमुकलीवर शाळेच्या उपाहारगृह चालकाकडून लैंगिक अत्याचार !
ठाणे, २५ ऑगस्ट (वार्ता.) – नायगावच्या ‘अवर लेडी ऑफ वेलंक’नी शाळेत उपाहारगृहात काम करणार्या १६ वर्षीय विधीसंघर्षग्रस्त बालकाने ७ वर्षांच्या चिमुकलीवर ४ ते ५ वेळा लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी नायगाव पोलिसांनी आरोपी विधीसंघर्षग्रस्त बालकाला पोक्सोच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे.
पीडित मुलगी या शाळेत दुसरी इयत्तेत शिकते. २२ ऑगस्टला ती शाळेतील उपाहारगृहात जाण्यास सिद्ध नव्हती. ‘उपाहारगृहात काम करणारा अंकल मला त्रास देतो’, असे तिने शिक्षिकेला सांगितल्यानंतर हा प्रकार शिक्षिकेने मुख्याध्यापक मेल्विन सिक्वेरा यांना सांगितला. त्यांनी लगेच या मुलीची विचारपूस केली तेव्हा मागील १५ दिवसांमध्ये शाळेच्या आवारात उपाहारगृहामध्ये काम करणारा १६ वर्षीय तरुण या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करत असल्याचे लक्षात आले. मुख्याध्यापक मेल्विन सिक्वेरा यांनी त्वरित याविषयीची माहिती नायगाव पोलिसांना दिली. एकदा मुलीने तिच्या घरीही याची माहिती दिली होती; परंतु त्यांनी तेव्हा गांभिर्याने घेतले नव्हते.
संपादकीय भूमिका :दिवसेंदिवस अल्पवयीन मुलींच्या असुरक्षिततेचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे ! |