(म्हणे) ‘महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद मुसलमानांना द्या !’
अस्लम शेख यांची महाविकास आघाडीकडे मागणी !
स्वातंत्र्यपूर्व काळातही मुसलमानांनी अशाच प्रकारच्या मागण्या केल्या होत्या. त्याचे भयंकर दुष्परिणाम सारा देश आज भोगत आहे. मुसलमानांचे तुष्टीकरण करणारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जोपर्यंत देशात आहे, तोपर्यंत हेच होत रहाणार, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !
मुंबई – मुसलमानांच्या मतांमुळेच महाविकास आघाडीला लोकसभेच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाले. राज्याची सत्ताही मुसलमानांच्या मतांमुळेच महाविकास आघाडीला मिळेल. त्यामुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत मुसलमान उमेदवारांना २० टक्के जागा द्याव्यात, तसेच महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपद मुसलमानांना द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री अस्लम शेख यांनी महाविकास आघाडीकडे केली आहे.
झिशान सिद्दिकी, अमिन पटेल आणि अस्लम शेख या ३ आमदारांमुळे मुंबईमध्ये काँग्रेस तरली. त्यामुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मुसलमान उमेदवारांना योग्य प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी अस्लम शेख यांनी महाविकास आघाडीकडे केली आहे.