धर्माभिमान असलेला ५६ टक्के आध्यात्मिक पातळीचा जामनेर, जळगाव येथील कु. अथर्व प्रमोद पाटील (वय १२ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. अथर्व पाटील हा या पिढीतील एक आहे !

‘वर्ष २०१८ मध्ये ‘कु. अथर्व प्रमोद पाटील उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ५५ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ५६ टक्के झाली आहे. त्याच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, त्याची साधनेची तळमळ आणि त्याच्यातील भाव यांमुळे आता त्याची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२१.८.२०२४)

‘श्रावण कृष्ण अष्टमी (२६.८.२०२४) या दिवशी कु. अथर्व पाटील याचा बारावा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्याच्या आईच्या लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. अथर्व पाटील याला बाराव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

कु. अथर्व पाटील
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. आईला घरकामात साहाय्य करणे

‘कु. अथर्व मला घरकामात साहाय्य करतो. मी सेवेनिमित्त किंवा अन्य कामासाठी बाहेर गेल्यास तो घरातील कामे करतो, उदा. केर काढणे, लादी पुसणे, स्वयंपाकघरातील ओटा आवरून ठेवणे.

२. धर्माभिमान आणि इतरांना धर्माभिमान बाळगण्यासाठी उद्युक्त करणे

सौ. मीनाक्षी पाटील

अ. तो टिळा लावून शाळेत जातो. त्याच्या शाळेतील विद्यार्थी आणि त्याला भेटणार्‍या व्यक्ती त्याला म्हणतात, ‘‘तू किती छान टिळा लावतोस.’’ तेव्हा अथर्व त्यांना टिळा लावण्याचे महत्त्व सांगतो. तो त्यांना सांगतो, ‘‘आपण हिंदु आहोत. पुरुषांनी कपाळाला टिळा लावायला हवा.’’ त्याने एका दुकानदारांना सनातनचे कुंकू आणि मेण यांच्या डब्या दिल्या. तेव्हापासून ते प्रतिदिन टिळा लावत आहेत.

आ. अथर्वचा ‘फळे आणि पालेभाज्या अन्य धर्मियांकडून घेऊच नये’, असा आग्रह असतो. तो त्याचे आजोबा आणि शाळेतील मित्र यांना सांगतो, ‘‘तुम्ही हिंदु व्यक्तींकडूनच फळे आणि भाजीपाला घ्या.’’

३. सेवेची आवड

त्याला सेवाकेंद्रात राहून सेवा करायला पुष्कळ आवडते. त्याने एप्रिल २०२३ मध्ये सुटीत सेवाकेंद्रात १५ दिवस राहून आनंदाने सेवा केली.

४. साधनेची ओढ

अ. अथर्व नेहमी मला सांगतो, ‘‘माझे इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करीन.’’

आ. अथर्वला नामजप करण्याविषयी सांगितल्यास तो मला म्हणतो, ‘‘आई माझा शाळेत नामजप चालू असतो. मी येता-जाता नामजप करतो. श्रीकृष्णबाप्पा (सूक्ष्मातून) कधी कधी माझ्या शाळेत येतो.’’

५. चुकांविषयी संवेदनशील

अथर्व मोठ्याने बोलत असतांना त्याला त्याविषयी जाणीव करून दिल्यावर तो ते लगेच स्वीकारतो आणि स्वतःत पालट करण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थ्यांनी गोंधळ केल्यास शाळेतील शिक्षक त्यांना अयोग्य पद्धतीने बोलतात. तेव्हा अर्थव मला म्हणाला, ‘‘हे किती अयोग्य आहे. मुलांवरही असेच अयोग्य संस्कार होतील. शिक्षकांनी असे बोलणे टाळायला हवे.’’

६. संत आणि गुरुदेव यांच्याप्रती भाव

एखाद्या प्रसंगात अथर्वचे मन दुखावले गेल्यास तो म्हणतो, ‘‘प.पू. डॉक्टर माझे सर्वस्व आहेत. तेच माझे आजी-आजोबा आहेत.’’ त्याच्यात सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे. तो मला सांगतो, ‘‘मी मोठा झाल्यावर सद्गुरु काकांच्या गाडीचा चालक होणार आहे.’’

– सौ. मीनाक्षी पाटील (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ४२ वर्षे), जामनेर, जळगाव. (१५.७.२०२४)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक