आध्यात्मिकतेचा अभाव वाढत असल्याचे लक्षण !
स्वामी विवेकानंद यांची शिकवण !
हिंदु धर्मावरून कधी भांडत बसू नका. धर्मासंबंधीचे सारे कलह आणि वादविवाद केवळ हेच दर्शवतात की, अशा लोकांच्या ठायी आध्यात्मिकतेचा अभाव आहे. धर्माविषयीचे झगडे (भांडणे) हे नेहमी धर्माच्या बाह्यांगावरूनच वा असार गोष्टींवरूनच होत असतात. जेव्हा पवित्रता आणि आध्यात्मिकता लोपून जीव शुष्क निःसार बनतो, तेव्हाच भांडणाचे फावते, आधी नाही.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)