Teacher sexually abused 9 girls : कोईम्बतूर (तमिळनाडू) : शिक्षकानेच केले ९ मुलींचे लैंगिक शोषण !
मुख्याध्यापकांसह ४ शिक्षकांना अटक !
चेन्नई (तमिळनाडू) – येथील(Tamil Nadu) एका शाळेत ९ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली आहे. एका पीडित विद्यार्थिनीनेच यासंदर्भात सांगितले. ती म्हणाली की, नटराजन् (Natarajan) नावाचा शिक्षक(Teacher) अनेक महिन्यांपासून अतिरिक्त वर्गाच्या नावाखाली तिचे लैंगिक शोषण करत होता. (असे वासनांध शिक्षक म्हणजे शिक्षणक्षेत्राला लागलेला कलंक ! – संपादक)
यानंतर इतर विद्यार्थिनींचीही चौकशी करण्यात आल्यानंतर नटराजन्ने इयत्ता सातवी, आठवी आणि नववी या इयत्तांत शिकणार्या ९ विद्यार्थिनींचा अनेक वेळा लैंगिक छळ केल्याचे लक्षात आले. यासंदर्भात मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षक यांना सांगितल्यावरही त्यांनी कोणतीच कारवाई केली नसल्याचे पीडित विद्यार्थिनींनी सांगितले. यामुळे आता मुख्याध्यापक आणि ४ शिक्षक यांना अटक करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाकोलकाता आणि बदलापूर येथील बलात्कारांच्या घटनांनंतर देशातील वातावरण तापले आहे. सामाजिक माध्यमांत प्रसारित झालेल्या अनेक व्हिडिओजमधून मुलींनी कायदा हातात घेऊन छेड काढणार्यांना ठार मारले पाहिजे, असा संदेश दिला जात आहे. त्यामुळे बलात्कार्यांना फाशीचीच शिक्षा देण्याचा कायदा आता झाला पाहिजे, असेच कोईम्बतूरसारख्या घटनेनंतर जनतेला वाटते ! |