महापालिकेच्या शाळांत सीसीटीव्ही प्रकल्पाची कार्यवाही न केल्याने मुंबई आणि ठाणे येथील शिक्षणाधिकार्यांचे निलंबन ! !
शाळा व्यवस्थापनावर गुन्हा नोंद
मुंबई / बदलापूर (ठाणे) – बदलापूर येथील अल्पवयीन विद्यार्थिनींवरील अत्याच्याराच्या घटनेनंतर मुंबई महापालिकेने शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ आणि ठाणे महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे या दोघांचेही निलंबन करण्यात आले आहे. महापालिकेअंतर्गत येणार्या शाळांमध्ये सीसीटीव्ही प्रकल्प राबवण्याची कार्यवाही न केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. बदलापूर येथील पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांचे स्थानांतर मुंबई येथे करण्यात आले आहे. (स्थानांतर करून मुलींच्या सुरक्षेचा मूळ प्रश्न कसा सुटणार आहे ? – संपादक)
शाळेच्या अधिकार्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती न दिल्याने विशेष तपास पथकाने त्यांच्यावर पॉक्सो कायद्याच्या कलम १९ च्या प्रावधानानुसार एफ्.आय.आर्. नोंदवला आहे.