सांगली येथे लाच मागणार्या महिला तलाठ्यासह दोघांवर गुन्हा नोंद !
ईश्वरपूर (जिल्हा सांगली), २४ ऑगस्ट (वार्ता.) – खरेदी केलेल्या शेतभूमीस नावनोंदणी करून उतारा देण्यासाठी १० सहस्र रुपयांची लाच मागणार्या येडेमच्छिंद्र येथील महिला तलाठ्यासह दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तलाठी सीमा मंडले आणि चंद्रकांत सूर्यवंशी अशी संशयितांची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. ईश्वरपूर पोलीस ठाण्यात या दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे. (लाचखोरांची संपत्ती जप्त करण्यासह त्यांच्यावर कठोर कारवाई केल्याविना लाचखोरी थांबणार नाही. – संपादक)
संपादकीय भूमिका :भ्रष्टाचाराने पोखरलेले महसूल खाते ! |