गुरुबोध
१. शब्दाविना संवाद : ज्या ठिकाणी प्रेम संपन्न होते, त्या ठिकाणी सद्भाव वाढतो. इतका वाढतो की, तो शब्दांत सांगता येत नाही. शब्दाविना संवादाचा रस्ता अध्यात्मात आहे.
२. महाराज : ज्या राज्यात अनेक राज्ये सामावून जातात, तो महाराज ! तो आत्मविद् (आत्मतत्त्व जाणणारा) आणि आत्मस्थित असतो.
३. चैतन्य : हे प्रवाही असते. ते जेव्हा सघन होते, तेव्हा ब्रह्म बनते; म्हणून ब्रह्मचैतन्य !
४. परमहंस : हंस असा लीलया संचार करतो की, जिथे तो संचार करतो, तिथली कुठलीही बाधा त्याला होत नाही. संसारात राहूनही ब्राह्मीस्थितीत रहाणारा तो ‘परमहंस’.
५. साधू : सहा विकार (काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर) ज्या ठिकाणी अधू होतात, तो ‘साधू’. साधू हा देह नाही, ती परब्रह्माशी एकरूप झालेली एक वृत्ती आहे !