‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या रकमेत भविष्यात प्रत्येक महिन्याला वाढ करू ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोल्हापूर – ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’मुळे महिलांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असून त्यांचे अर्थकारण अधिक बळकट होत आहे. ही योजना बंद तर होणारच नाही, उलट भविष्यात या योजनेतील प्रत्येक महिन्याला मिळणार्या रकमेत वाढ करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कोल्हापूर येथील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ वचनपूर्ती सोहळा कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील सहस्रो महिलांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांसह अन्य उपस्थित होते.