पाक संपत चालला, तरी जिहाद सोडत नाही. याउलट हिंदू संपत चालले, तरी ते जागृत होत नाहीत ! हे हिंदूंना लज्जास्पद !
‘गझवा-ए-हिंद’ नीट समजून घ्या. ते एक अतिशय भयानक युद्ध असेल. ते अनेक वर्षे चालू रहाणार आहे. या युद्धात भारत पुन्हा एकदा मुसलमानांच्या कह्यात आला की, तो आपल्याकडेच राहील, असे चिथावणीखोर वक्तव्य पाकिस्तानचा कथित संरक्षणतज्ञ झैद हमीद याने केले. त्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे. प्रखर हिंदुत्वनिष्ठ मधु पूर्णिमा किश्वर यांनीही तो प्रसारित केला आहे. हा व्हिडिओ नेमका केव्हाचा आहे ?, हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही.
— Madhu Purnima Kishwar (@madhukishwar) August 21, 2024
या व्हिडिओमध्ये झैद हमीद पुढे सांगतांना दिसत आहे की,
अ. जे ‘बुतपरस्त’ (मूर्तीपूजक) होते, त्यांची शेवटची पिढी आता केवळ भारतात उरली आहे. संपूर्ण मुसलमान जगात तुम्हाला असे ‘मुश्रीक’ (बहुदेववादी) मिळत नाहीत, जे भारतात आढळतात.
आ. ही तीच जात आहे, ज्याने काबाच्या आत मूर्ती ठेवल्या होत्या. आता त्याच मूर्ती आणि त्यांच्यासारख्या सहस्रावधी मूर्ती अन् देव यांना त्यांनी भारतात ठेवले आहे.
इ. पुन्हा एकदा या सर्व मूर्तींचे भंजन होणार आहे. महंमद गझनीने ज्या प्रकारे सोमनाथ आणि इतर मंदिरे पाडली होती, त्याच पद्धतीने सर्व मंदिरे पाडली जातील. आता मूर्तीपूजा पूर्णपणे नाहीशी होईल. साहजिकच हे युद्ध भयावह असेल. ते एका दिवसाचे नसेल.’