राज्यात ठिकठिकाणी पावसाचा जोर !
मुंबई – राज्यात ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढला असून पुढील ३ दिवस हा जोर कायम रहाणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
अंधेरी (मुंबई) – २४ ऑगस्ट या दिवशी अंधेरी मिलन सबवे येथे दुपारी ३ फूट पाणी साचले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. पूर्व आणि पश्चिम या भागामधील वाहतूक बंद पडल्याने वाहने ताटकळून उभी राहिली. जनरेटरने या भागातील पाणी काढण्यात येत होते. मुंबईत ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांत दुपारी मुसळधार पाऊस झाला.
पालघर – येथील धामणी धरणाचे पाणी सूर्या नदीत विसर्ग करण्यात आल्याने पाण्याची पातळी वाढली.
गडचिरोली – येथेही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.
धुळे – शहाराला पावसाने झोडपले.
नाशिक – येथे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली. दुपारी दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आले होते. छोटी देवळे पाण्याखाली गेली, तर मोठी देवळे अर्धी पाण्याखाली गेली. पर्यटक पाण्यात जाण्याचा प्रयत्न करत होते; मात्र येथे महापालिकेचे कर्मचारी किंवा पोलीस त्यांना अडवण्यासाठी उपलब्ध नव्हते.
रायगड – जिल्ह्यात दुपारी ३ – ४ घंटे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.