आरोपीला कठोर शिक्षेची भाजपची मागणी !
सांगली, २४ ऑगस्ट (वार्ता.) – बदलापूर येथे घडलेली घटना ही मनाला चीड आणणारी आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी २४ ऑगस्ट या दिवशी सकाळी १० वाजता विश्रामबाग येथील भाजपच्या कार्यालयासमोर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
या वेळी भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या सौ. नीता केळकर, युवा नेते श्री. पृथ्वीराज पाटील आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.