FIR Against Sandip Ghosh : ‘राधा-गोविंद कर’ वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी प्राचार्यांविरुद्ध गुन्हा नोंद !
कोलकाता : कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सीबीआयने ‘राधा-गोविंद कर’ वैद्यकीय महाविद्यालयाचे (‘आर्.जी. कर मेडिकल कॉलेज’चे) माजी प्राचार्य संदीप घोष यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, कोलकाता पोलिसांच्या विशेष अन्वेषण पथकाने २४ ऑगस्ट २०२४ या दिवशी निजाम पॅलेसमधील सीबीआय कार्यालयात जाऊन सर्व कागदपत्रे सीबीआयकडे सोपवली. कागदपत्रे मिळाल्यानंतर सीबीआयने संदीप घोष यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले.