Crisis In Russian Prison : रशियातील कारागृहात आतंकवादी आणि सुरक्षादल यांच्यात संघर्ष : ८ जण ठार
मॉस्को (रशिया) – रशियाच्या व्होल्गोग्राड भागात असलेल्या ‘आयके-१९ सुरोविकिनो पॅनेल कॉलनी’ या उच्च सुरक्षा कारागृहात इस्लामीक स्टेटचे ४ आतंकवादी आणि सुरक्षादल यांच्यामध्ये रक्तरंजित संघर्ष झाला. या संघर्षात ८ जणांचा मृत्यू झाला. आतंकवाद्यांनी कारागृहातील कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी यांच्यावर चाकूने आक्रमण केले. त्यानंतर सुरक्षादलांनी चारही आतंकवाद्यांचा ठार केले. या आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ४ सैनिक ठार झाले. या आतंकवाद्यांनी १२ जणांना ओलीस ठेवले होते. हे आतंकवादी उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान देशांतील होते.